समर्थांची करुणाष्टके (५)
कडवे विसावे...
समर्थ म्हणतात..
रामदास म्हणे माझा..
संसार तुज लागला..
संशयो वाटतो पोटी..
बुद्धि दे रघुनायका..!
रामराया... मी स्वतःला तुझा दास समजतोय,तुझा सेवेकरी,तुझा अंकित मी आहे.माझं जगणं,माझा प्रपंच,माझा उदरनिर्वाह हे सगळं आता तू आहेस.त्यामुळे माझं जीवित असणं हेच आता रामदासी आहे.
रामराया..हे सगळं असून सुद्धा मला उगीचच संशय वाटतो.मन भयभीत होतय.तुझ्या निर्गुण भक्तीत स्वतःच अस्तित्व मिळून जावं तो क्षण दुरावतोय की काय अशी आशंका मनात वारंवार उठती आहे.
रामराया..या सगळ्याचा सुखांत हा तुझ्याशी एकरूप होण्यातच आहे..म्हणून मला अश्वस्त होण्यासाठी तू मला अचल अशी बुद्धि दे..!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:
Post a Comment