समर्थांची करुणाष्टके (४)
कडवे नववे.
समर्थ म्हणतात..
ब्रिदाकारणे दीन हाती धरावे..
म्हणे दास भक्तांसी रे उद्धरावे..
सुटो ब्रीद आम्हांसि सांडूनि जाता..
रघुनायका मागणे हेंचि आता..!
रामराया....अनादी काळापासून तू भक्तांना प्रसन्न होणारा आहेस.त्यांच्यासाठी धावून येणारा आहेस.त्यांच्यासाठी तिष्ठत असतोस..आणि हे तुझं असणं हे कायमच तुझं ब्रीद आहे..हे तू भक्तांना दिलेलं वचन आहे..!ते आता सिद्ध करशील ना..?
रामराया..तू हे सिद्ध करून साऱ्या भक्तांचा उद्धार करून त्यांचं जीवन कृतार्थ करशील.त्यांच्या मनात भक्ती निर्माण करून,त्याच पोषण करून तू मनुष्याला सिद्ध स्वरूपापर्यंत किती सहजपणे आणतोस.ते आता माझ्यासाठी करशील ना रे रामा..!
रामराया..तुला माहिती आहे का?अस जर तू केलं नाहीस तर तुझी संत,महानुभवांनी केलेली स्तुती ही खोटी ठरेल.. तू मला,माझ्यासारख्या भक्तांवर कृपा केली नाहीस तर तुझं भक्तपालक हे ब्रीद खोटे ठरेल ना..?
रामराया..माझी भक्ती जरी कमी पडत असेल,माझ्यातल्या वैगुण्य जरी अजून पुरत सरल नसेल तरी कृपावंत हे ब्रीद राखण्याची मागणी मी तुझ्याकडे वारंवार करतोय..!
समर्थ वात्सल्यभक्ती अनुसार येणारा अधिकार इथे वापरतायत.आपण ज्याच्या भक्तीत,प्रेमात अखंड आहोत तिथंच आपण प्रेमाचा अधिकार गाजवू शकतो..!समर्थ तोच लाघवी अधिकार इथे वापरतायत..!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८१२६३५९०२

No comments:
Post a Comment