समर्थांची करुणाष्टके (७)
कडवे दुसरे...
समर्थ म्हणतात..
जनी बोलता चालता वीट वाटे..
नसे अंतरी स्वस्थ कोठे न कंठे..
घडीने घडी चित्त किती धरावे..
रघुनायका काय कैसे करावे..?
रामराया..माणूस म्हणून जन्माला घातलंस खर तू..पण त्या माणसांपासून,समूहापासून एक प्रकारची निरिच्छता येऊ लागली आहे.त्यांच्याशी वार्तालाप करण्यापेक्षा मला स्वतः स्वस्थ,एकट राहावं वाटू लागलं आहे..!
रामराया..पण ही स्वस्थता या भौतिक जगात राहून मला अनुभवताना माझ्या तुझ्याबद्दल असलेल्या ओढीमुळे एकप्रकारची उदासीनता आली आहे.त्यामुळे कुठेच चैन पडेनास झालं आहे.आयुष्य बेचव होऊ लागलं आहे..!
रामराया..प्रत्येकवेळी माझं मन मी ओढून तुझ्या उपासनेत,तुझ्या चरणाशी आणून ठेवायचा प्रयत्न करतोय.माझं चित्त हे तुझ्या सुमुख दर्शनात,उपासनेत गुंतून ठेवायचा प्रयत्न मी किती वेळा करू..?
रामराया..सांग ना..?इतक्या द्विधा मनअवस्थेतून तुझ्याशी एकसंध भक्तीचा संग मी कसा करू..?
समर्थ दिवसेंदिवस विजनवासाच्या अवस्थेत येणाऱ्या मानसिक आरोह,अवरोहाच्या निरनिराळ्या अवस्था समजवून सांगताना त्यातून तरुन जाण्यासाठी रामरायाला मित्रसाक्षी ठेवत आहेत.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:
Post a Comment