समर्थांची करुणाष्टके (७)
कडवे पाचवे..
समर्थ म्हणतात..
म्हणे दास उदास झालो दयाळा..
जनी वेर्थ संसार हा वायचाळा..
तुझा मी तुला पूसतो सर्वभावें..
रघुनायका काय कैसे करावे..!
रामराया..तुझी कृपा आहे म्हणून माझे श्वास,आयुष्य,व्यवहार,प्रपंच चालू आहे.पण मला तुझ्या कृपेच पूर्णत्व पाहिजे.संपूर्ण लीनता पाहिजे.अशा अर्धकृपेमुळे मी उदास होतोय..निराश होतोय..!
रामराया..माझी प्रत्येक कृती,प्रत्येक हालचाल,प्रत्येक कल्पना ही तुझ्या सकृत दर्शनाशिवाय वायफळ वाटतीये.अर्थहीन वाटतेय..!
रामराया..तुझा आहे ना मी??तू माझा त्राता आहेस ना??तुझ्याशिवाय मी कुणाला विचारणार..?तुझ्याशिवाय मी कुणाजवळ व्यक्त होणार..?
रामराया..याच हक्काने विचारतोय.. सांग ना..मी काय केले म्हणजे माझी भक्ती,उपासना फलद्रुप होईल.तुझं सुमंगल साकार दर्शन होईल..?
समर्थ विविध भक्तीच्या प्रकारातील सख्य भक्तीचा इथे उल्लेख करून रामरायाकडे आतिशय हृद्य असे आवाहन करतायत..!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:
Post a Comment