जागतिक पर्यावरण दिन..
समर्थांची निसर्गपूजा
समर्थ म्हणतात..
पसरले सरले गिरी साजरे।
सरवटे धुकटे भरितें भरें।
बहुत वात झडांत झडाडितो।
वर तरू वरता चि कडाडितो।।
शब्दांची सुंदर बरसात.समर्थ शब्द देतात तो फक्त यथार्थ देतात.निसर्गाची असीम व्याप्ती हा दऱ्याखोऱ्या अनुभवलेला संत मनस्वीपणे सांगतो.
उंच डोंगरमाथ्यावर उभारून क्षितिजाकडे बघताना समर्थांनी त्याच केलेलं वर्णन.. लांबपर्यंत पसरलेल्या डोंगररांगा या आपल्याला त्यांच्या पलीकडे क्षितिजापर्यंत कल्पनाशक्ती जाईल,पोहचेल इथपर्यंत घेऊन जातात.निसर्गात बाष्प आणि ऊन या दोन्हीमुळे येणारी धुसरता या डोंगरमाथ्याला सलगी धरून आहेत.अत्यंत सखोल लिहिणारे समर्थ माणसाची संकल्पशक्ती,आकलनशक्ती आणि त्यावर येणारे तात्कालिक मानसिक शैथिल्य या धुक्याच्या रूपाने वर्णन करतात.अशावेळी या निसर्गाच्या कुशीत चैतन्यरुपी वारा खेळू लागतो.निसर्गदेवतेच्या प्रतिकात प्राण खेळू लागतो.आकाशातून या निसर्गदेवतेवर विजेचा त्या वाऱ्याच्या आरोह अवरोहावर मंत्ररूपी घोष चालू होतो...!
झिरपती झरती झरती झरे।
न धरितां धरता निर वावरे।
बहुत पाभळ वोघ महीतळी।
नभकटे धुकटे कटपाभळी।।
आहाहा..ही एकदा निसर्गपूजा चालू की त्यावर अभिषेक चालू होतो.त्या निसर्गदेवतेच्या अंगोपांगावरून हे पाणी खळाळत या निसर्गपुरुषाच्या पायाशी खेळू लागत.मनरुपी निसर्गाच असच होत असेल ना??एकदा उपासनेचा अभिषेक चालू झाला की सार अंगोपांग,मन तीर्थ होऊन जातं.आणि या तीर्थाची जागा एकच आपल्या आयुष्याची कृतार्थता..तसेच निसर्गात या जलाभिषेकाची अंतिम जागा एकच तृषार्त भूमी..!
सरस रम्य रसाळ वनांतरा।
हरित रंग सुरंग दिसे बरा।
दिसतसे रमणीय वसुंधरा।
नुतन पल्लव हा तरु साजिरा।।
निसर्गपुरुषाच्या या पूजेच पूर्वांग झालं की त्यावर वस्त्रपूजा चालू होते.हिरवीगार मखमली वस्त्रे त्यावर नुकत्याच वर्षलेले जलमोती.रसाळ,अतिशय कोमल दिसणारी ही वसुंधरा ही निसर्गपूजेच एक सुंदर,मनमोहक रूप दाखवून जाते.पत्रपूजा आरंभुन ही निसगदेवता स्वतःला अजूनच स्पृहल करून घेते..!
दृम लता समता तृण मातले।
सुख मनीं सुमनीं मन रातलें।
परम सुंदर ते खग बोलती।
गमतसें वसती कमळापती।।
या निसर्गपूजेचा पुढचा विधी हा आभूषणांचा..असंख्य वेली, विविध गवतपात्यांची आसने, रंगीत पुष्पांचे मनभावन दागिने भोवती मलंग पक्ष्यांची कोमल गान,आरतीसेवा..या सगळ्यामध्ये विराजमान झालेला तो निसर्गपुरुष..शेषशायी विष्णुसारखा..!!
विमळ सूसिळ तें स्थळ पाहतां।
सुख विशेष घडे पळ राहतां।
वरदराज विराजतसें वनीं।
विनटला नटला रत सज्जनी।।
असा हा सोहळा.पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.क्षणभर ती निसर्गदेवता ज्यात माझा देव मी पाहतो त्याच्या छायेत,पायाशी मी बसलो तरी मन आनंदित कृतार्थ होऊन जाते. सर्व जगनियंता असा हा निसर्गदेव असा जेंव्हा या ऋतूत सिहासनाधिष होतो.तेंव्हा त्याच्या पूजेचा,मानसपूजा करायचा मोह माझ्या शुद्ध भावनेला नेहमीच होतो..!
समर्थ लिहितात तेंव्हा वर्णन जगतात.त्यांची भाषा ही नेहमीच गूढ असते.या निसर्गपूजेचा,वर्णनाचा आधार घेऊन समर्थ आपल्याकडून अलगद पणे निसर्गदेवतेची मानसपूजा करून घेतात.
हीच समर्थांची शब्दपूजा..समर्थपुजा..!!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:
Post a Comment