*समर्थरचित चौपदी*
*भाग ८*
*तद्रूपता मज दे रे राम..*
*अर्थारोहण दे रे राम..*
*सज्जनसंगती दे रे राम.*
*अलिप्तपण मज दे रे राम..!*
समर्थ म्हणतात..
रामराया..
एकाग्रता मनाची दुर्लभ पण छान अवस्था.त्यातुन जन्म घेते तद्रुपता..!तनुमनुचे भाव एक होणं.लिन होणं.स्वतःला विसरून स्वतःतल्या तुला जागत ठेवण,म्हणजे तुझ्याशी तद्रुपता..!ती तद्रुपता रामा मला दे रे..!!
रामराया...तुझी अनेक वचन,तुझी अनेक स्तोत्रे, तुझे अनेक गुणवर्णन हे मला पामराच्या बुद्धीत प्रतीत होऊ देत.त्या त्या शब्दांचे नेमके अर्थ,त्यातील गुह्यता,गूढता,मतितार्थ हे सगळं माझ्या आकलनशक्तीला कळत राहोत.असा अर्थारोहणाचा व्यासंग मला मिळू दे रे रामा..!!
रामराया..तुला माहितीये तुझ्या आसपास तुझ्या भोवती मी असतो त्याचे श्रेय माझ्याभोवती असलेल्या सश्रद्ध,सुहृद,सुस्वभावी सज्जनांना आहे.माझ्यापर्यंत जे मला हितकारक नाही ते पोहचतच नाही.त्यासाठी हीच सज्जनांची मांदियाळी माझ्या भोवती नेहमीच असू देत रे रामा..!!
रामराया..सगळं देतोस.मुक्तपणे देतोस.त्याबरोबर मला अलिप्तता पण दे.कोणत्याही कार्याची उभारणी,स्वबुद्धीचा अभिमान वाटू लागेल इतकं त्यात मला गुंतवू नकोस.मला तिथून लगेच अलिप्त कर.तरच मी निरक्षीर विवेकाने स्वतःला तुझा दास म्हणवून घेऊ शकतो.ते स्वतःसाठी पोषक असलेलं अलिप्तपण मला दे रे रामा..!
समर्थांचा पिंड मूळ संन्यासाचा.पण अशा प्रकारचा पूर्ण संन्यास घेऊन काहीश्या कर्मठ आणि कठीण संन्याशीव्रतामुळे लोकांच्या कडून जो समाज घडवून घ्यायचा आहे तो घडवून घेता येणार नाही हे त्यांनी ताडल होत.म्हणून त्यांनी समाजात राहून समाजाभिमुख संन्यास शिकवला.अलिप्तता शिकवली.अभ्यास शिकवला.भक्तीला नवीन परिमाण दिलं.रामी रामदासी झाला.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment