*समर्थरचित चौपदी*
*भाग ९*
*ब्रम्हअनुभव दे रे राम..*
*अनन्यसेवा दे रे राम..*
*मज वीण तू मज दे रे राम..*
*दास म्हणे मज दे रे राम!*
समर्थ म्हणतात..
खूप झाले आता ऐहिक,सामाजिक,प्रापंचिक अनुभव,खूप झाले.आता नको.रामा आता तो अनुभव दे जो मिळाला की मनुष्य तुझा होतो.तो ब्रह्माअधिष्ठित सोहळा मला माझ्या बाबतीत घडताना बघायचाय..तो ब्रम्हअनुभव दे रे रामा..!
रामराया..मला समाजाची,परंपरेची,धर्माची,देशाची कोणत्याही अपेक्षेशिवाय सेवा करायची बुद्धि आणि कायम संधी दे..!जसा तुझ्या सेवेत,अर्चनेत तुझी मी अनन्यभावाने पूजा करायची अशी इच्छा करतो.तशीच ही सेवा माझ्याकडून करून घेशील ना रे रामराया..?
रामराया.. हे सगळं मी तुझ्याकडे मागतोय पण अस ही होईल ना रे..?हे सगळं मागायच्या ऐवजी तूच मला मिळावास.म्हणजे ही पावनभिक्षा मागायची वेळच येणार नाही.तूच दाता आणि तूच भोक्ता..!आता मात्र हीच भिक्षा दे रे रामा...!
रामराया..शेवटी तुझाच तर मी आहे.तुझा दास,तुझा अश्रीत आहे.तू देशील ते मी घेईन..तू सांगशील तेच आचरण करेन..!त्यामुळे ही पावनभिक्षा मला दे किंव्हा तू स्वतःला मला देऊन टाक. मला रामरूपी करून घे..!आता हे तरी कर ना रे रामा..!
समर्थ पावनभिक्षेची याचना आणि हट्ट हे दोन्ही करतात.अनंताची अक्षयी मागणी..!समर्थ हे लिहिताना त्यांच्यासाठी हे सगळं मागत असतात.पण कळत की आपल्याला ह्या पावनभिक्षेची जास्त आवश्यकता आहे.खर म्हणजे समर्थ हे सगळं आपल्यासाठीच तर रामाकडे साकडं घालतायत..!आपण झोळी सदा उघडी ठेवूया आणि समर्थांकडे,रामाकडे हीच पावनभिक्षा मागूया..!
मजविण तू मज दे रे राम..!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment