*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग २*
*भाग १*
*का हो रामराये दुरी धरियेलें..|*
*कठीण कैसे झाले चित्त तुझे.?||१||*
*देऊन आलिंगन प्रीति पडीभरे..|*
*मुख पीतांबरे पुसशील..||२||*
समर्थ म्हणतात..
रामराया..सांग ना? मी तुझ्यासन्मुख उभा राहून तुझी उपासना,आराधना करतोय.तुझी मानसपूजा करतोय.नामपूजा करतोय.पण तु मला अजूनही दूरच ठेवलं आहेस.अस का बरं करतो आहेस.?
समर्थ म्हणतात..
रामराया..तू तर दयार्द्र चित्ताचा म्हणून प्रसिद्ध आहेस.तू भक्तांच्या मनातलं ओळखून प्रसन्न होतोस.मग आता तुझं हृदय इतकं कठीण का झालय.?का तू मला तुझ्या चरणाशी जागा देत नाहीयेस.?
समर्थ म्हणतात..
रामराया..तू मला जवळ घेऊन प्रेमभराने उराउरी भेटशील.मला आलिंगन देऊन कृतार्थ करशील..!पण हे केंव्हा करशील रे..?
समर्थ म्हणतात..
रामराया..माता जशी बालकाला जवळ घेऊन पदराने त्याच कपाळ,मुख मायेने पुसते. तस तू ही तुझ्या रेशमी पितांबराने माझ्या कपाळावर उमटलेले धर्मबिंदू टिपून घेशील ना?
समर्थ रघुराजाला आईच्या रुपात बघून त्याने वात्सल्यपूर्ण प्रेम,काळजी आपली करावी असा बाल्यसुलभ हट्ट त्याच्याकडे करतायत.लिन भक्तीच आणखी एक रूप.समर्थ जगतायत आणि आपल्याला ही ते रूप दाखवत आहेत.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment