*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग २*
*भाग २*
*घेउनी कडिये धरुनी हनुवटी.|*
*कई गुजगोष्टी सांगशील.||३||*
*रामदास म्हणे केंव्हा संबोधीशी.?|*
*प्रेमपान्हा देशी जननिये..||४||*
समर्थ म्हणतात...
रामराया...
खूप लटक्या रागांना भुलून किंव्हा तापत्रयीच्या माझ्या त्रासामुळे जेंव्हा मी दुश्चित्त होतो तेंव्हा रामराया तू असा अचानक मला तुझ्या आधाररुपी कडेवर घेऊन माझ्या हनुवटीला धरून माझी समजूत काढशील ना?
समर्थ म्हणतात..
रामराया...मला तू समजावशील, सांगशील काही इष्ठ गोष्टी ज्या मला माझं मन स्थिर होऊन पारमार्थिक रंगात तू मला सहज रंगवून घेशील ना.?
समर्थ म्हणतात..
रामराया...सांग ना केंव्हा बोलावशील..?केंव्हा स्वतःच्या आसपास मला कायम ठेवून घेऊन मला या प्रपंचातून अनासक्त करशील..?
समर्थ म्हणतात..
रामराया ..मी अधीर झालोय.तू आता माझी रामाई होऊन मला छातीशी कवटाळून मला प्रेमाच,वात्सल्याच अमृत दे..!आणि ते प्राशन करून मी आयुष्यच कल्याण करून घेईन.
समर्थ बालक होतायत.रघुराजाच रामाईत रूपांतर होऊन ती समर्थांची काळजी घेतीये.त्यांचे लाड पुरवतीये. त्यांचे पारमार्थिक हट्ट जाणून घेऊन समर्थाना आश्वस्त करती आहे.
असे मातृस्वरूपातले रामराय समर्थ अनुभवत आहेत.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment