*समर्थांचे साहित्यविश्व*
*अभंग ४*
*भाग २*
*बोले शब्दज्ञान..|*
*अंतर्यामी समाधान.||३||*
*रामी रामदास कवी.|*
*न्यायनीतीने शिकवी.||४||*
समर्थ म्हणतात...
संत,ज्ञानी लोकांच्या पदरी असतात विपुल शब्दांची भांडारे. ज्यायोगे ते परमेश्वर भक्ती,शक्ती आणि वृत्ती हे सारे समजून सांगतात.त्यांना जे ज्ञान जाणिवेने अनुभुती ने मिळत ते शब्दांच्या द्वारे आपल्याला सांगायचा प्रयत्न करत असतात.
समर्थ म्हणतात...
हे सारं सांगून ज्ञानी जन त्या त्या दैवतांच्या मानसपूजेचे,धर्मसेवेचे समाधान मिळवतातच.पण त्या बरोबर ते त्यांच अंतर्मन शुचिर्भूत करून घेतात.पावन करून घेतात.
समर्थ म्हणतात...
असा हा शब्दांचा धनी असलेला रामदास जो रघुराजाचा अनन्य सेवक आहे.तो रामस्तुती कविमनाने करतो.आणि ही स्तुती आपल्यासारख्या भक्तजनापुढेही प्रस्तुत करतो.
समर्थ म्हणतात...
ही काव्ये,ओव्या,भजने नीतिशास्त्र,न्यायशास्त्र,भक्तीशास्त्र याला अनुसरूनच आहेत.आणि म्हणूनच या सगळ्या पारमार्थिक कथा हा रामदास,जनांना उपदेशीत करत आहे.
समर्थ आदर्श अश्या या पंथा तील रामदासाची व्यक्त होण्याची पद्धत आणि तिची पार्श्वभूमी आणि त्याच्या व्यक्तिमत्वातील उत्तम लक्षणे या अभंगात वर्णन करून सांगत आहेत.हा आदर्श असा रामदासी आपल्या समोर उभा करायची शक्ती या काव्यकृतीत आहे.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment