*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
*रघुपतीतनूरंगे रंगली नीळशोभा..|*
*रघुपतीरूपयोगे सर्वलावण्यगाभा.|*
*रघुपतीगुणगंधे धैर्य गांभीर्य लोकी..|*
*रघुपति मम चित्तीं बैसला येकनेकी..||*
समर्थ म्हणतात...
हे विश्व राममय आहे.रामरायांच्या निळ्या,सावळ्या कांतीने या गगनाला निळ्या रंगाचे अस्तित्व आले.हे निळे गगन गहन आणि सूनयन झाले केवळ रामरायांच्या अस्तित्वामुळे..!
समर्थ म्हणतात...
रामरायाची तेजल आभा,त्याच सहजसुंदर दर्शन,त्याच मनोहरी सौष्ठव या मुळे विश्वात पौरुष सौंदर्याचा आदर्श सृष्टीत निर्माण झाला.सुखकारी अस हे दर्शन अंतिम सुखाचा विसावा आहे.
समर्थ म्हणतात..
रामरायांचे अनुपम गुण एकबाणी, एकवचनी,एकव्रती,धैर्यव्रती असे अनेक.अशा साऱ्या गुणांमुळे समाजात चांगुलपणा,सृजनता यांची जोमाने वाढ झाली.हे सारे गुण भूषणावह ठरले.ते एकमेव,अद्वितीय ठरू लागले..!ह्या साऱ्या चांगल्या गुणांचे मनुष्यप्राणी अस्तित्व जपू लागले.
समर्थ म्हणतात...
असा एकमेव,एकद्वितीय रामराजा माझ्या मनात वास करून आहे.अनेक अशा उत्तम चारित्र्यवान देव,संतामधून त्याचे अस्तित्व वेगळे,मनोहारी असे मला जाणवते.आणि त्याचीच उपासना मी मनोभावे करतो.
श्रीरामांच वर्णन समर्थ करतात.सहजसुंदर अस्तित्व समजावून सांगतात..!जे त्यांना मनातून जाणवत.जे त्यांच्या उपासनेत त्यांना गवसत..!
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment