*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*त्रैलोक्यनाथ रघुनाथ अनाथबंधु.|*
*त्रैलोक्यनाथ रघुनाथ करुणाएकसिंधू.|*
*त्रैलोक्यनाथ रघुनाथ कोदंडधारी.|*
*त्रैलोक्यनाथ रघुनाथ लीळावतारी..||*
समर्थ म्हणतात..
त्रैलोक्य हे सर्वभूतांचे वसतिस्थान.तिथे स्वामी असणारे रघुराज.हे रघुराज या सर्व लोकातल्या चराचराचे,नश्वरांचे,प्रत्येक ऋणानुबंधाचे, प्रत्येक एकल आयुष्याचे साक्षी आणि सहकारी आहेत.
समर्थ म्हणतात..
या त्रैलोक्यातील रघुराजांचे अस्तित्व हे सर्व मानवजातीला,प्राणिमात्रांना,आशादायक असे वात्सल्यपूर्ण करुणेचा स्त्रोत्र आहेत.हे एक करुणेचा निरंतर अक्षय सागर आहेत.
समर्थ म्हणतात..
त्रैलोक्य व्यापून उरलेले हे रघुनाथाचे स्वरूप तापत्रयी,तसेच भवसागरातील संकटे,विघ्ने यांचे निर्दालन करण्यासाठी कोदंड स्वरूपाची शक्ती हाती बाळगून आहे.
समर्थ म्हणतात..
त्रैलोक्यनिवासी अशा विष्णूच्या सप्तम अवतारातील अवतारीत अशा या दैवताच्या अगम्य पण सूचित,सुलक्षणी लीळा या समस्त ब्रह्मांडासाठी एकमेव आणि अद्वितीय आशा आहेत.
समर्थ रामराजाचे अतिभव्य असे रूप इथे प्रकट करतात.राम हा केवळ वर्णनाने अनुभवण्यापेक्षा तो स्वतः जेंव्हा प्राचितीने अनुभव देतो तेंव्हा आपल्याला वर्णनात्मक हे कौतुक कमी पडते.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment