*समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)*
🌺
*जेणे सोडिल्या देवकोटी अचाटा..|*
*सुखे चालती स्वर्गीच्या स्वर्गवाटा..|*
*प्रतापेचि त्रैलोक्य आनंदवीला..|*
*प्रभू देखिला दास संतुष्ट झाला..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
रामप्रभु हा सर्वोच्च देव आहे ज्याने सगळ्या देवांना सत्वाचे आदर्श निर्माण करून दिले.आणि त्या सत्वाच्या महिरपीत देवत्व सिद्ध केलं आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
या रामप्रभुने त्याचे आदर्श दाखवून,त्यावर सज्जन लोकांना स्वर्गलोकीच्या सुखकर वाटा त्यागाने आणि सत्वबुद्धीने सुकर केल्या आहेत.
समर्थ रामदास म्हणतात..
या रामप्रभुने असुरांशी युद्ध करून,असत्य,असत्व यांचा पराक्रमाने पराभव करून या त्रैलोक्यात आनंदवनभुवन प्रस्थापित केले आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
असा रामरायाचे दर्शन आज करून मनाचा गाभारा सुखाने भरून जातो.त्यामुळे मनाची,आयुष्याची तृप्तता पूर्ण होते आहे.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment