*समर्थांचे साहित्यविश्व*
*करुणास्रोत्रे* *संकीर्ण*
*रघुविरभजनाची मानसी प्रीति लागो..|*
*रघुवीरस्मरणाची अंतरी वृत्ती जागो..|*
*रघुवीरचरणांची वासना वास मागो..|*
*रघुवीरगुण गाता वाणी ही नित्य रंगो..||१||*
समर्थ म्हणतात..
रघुराजाच संकीर्तन हे मनाची लागलेली गोडी आहे.त्याबद्दलच प्रेम,आसक्ती अशीच राहो त्यात निरंतर वृद्धी होवो.
समर्थ म्हणतात..
रघुराजाच स्मरण हे एक चैतन्य आणणारा स्रोत आहे.तो अंतरी बाळगायची इच्छा आहे.हीच वृत्ती जागती राहो.आणि वाढती ही राहो.
समर्थ म्हणतात..
रघुराजाचे चरण हा एक रम्य असा शुद्ध हव्यास आहे.आणि त्या चरणाशी एकनिष्ठ राहून आयुष्य व्यतीत करणे ही इच्छा..!त्या चरणाचा नित्य सहवास मागावा..!
समर्थ म्हणतात...
रघुराजाच सुनीत संकीर्तन वर्णन करणं,गायन करणं हे नित्य वाणीची,मनाची शुद्धी आहे.आणि ह्यातच रंगून आयुष्य कृतार्थ करायची सवय ही मनाला लागावी.
समर्थ रघुवीर भजनाची निकड समाजवून सांगताना आयुष्याच्या प्रत्येक क्षणी रघुवीरसंकीर्तन कसे असावे याची ही अपेक्षा समजावून सांगतात.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment