*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*चळेना समरंगणी ठाण मागे..|*
*चळेना मुखे बोलता वाक्य युगे..|*
*चळेना कृपासिंधु कल्पांतकाळी..|*
*रघुराज हा आदरे दास पाळी..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
कोणतंही समरंगण असो जे मनात उठत ते द्वंद्व किंव्हा जे दोन विचारात उठतो तो विकल्प,किंव्हा नीती,अनीती मधील अक्षय लढाई अशा काळात जो दृढपणे सदप्रवृत्त भक्तांच्या मागे उभा राहतो असा हा रघुराज आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
हा रघुराजा ज्याच वचन हे एकवचन म्हणून सुप्रसिद्ध आहे.जे कालातीत,युगातीत आहे.कितीही काळ गेला तरी ते वचन काळांचे, युगांचे पडदे भेदून सुद्धा शुद्ध रहाते.
समर्थ रामदास म्हणतात..
या रामरायाचे रामतत्व असे आहे की कल्पांताचा मेघ जरी भूमीवर प्रकटला तरी या रघुराजाची कृपा करण्याची वृत्ती अबाधित,अक्षय रहाते.
समर्थ रामदास म्हणतात..
असा हा प्रेमळ रघुराजा अतिशय आत्मियतेने आणि अखंडपणे दासाची,भक्तांची काळजी घेत आपलं भक्तवत्सल हे विशेषण सिद्ध करत असतो.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment