समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*चपेटा विझे काळमाथा जयाचा..|*
*धरी रे मना पंथ या राघवाचा..|*
*विवेकी जने राजपंथे चि जावे..|*
*तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

ज्याच्या नामाच्या सत्वगुणी आघाताने मनुष्याच्या अदृष्ट भाळी जे काही विघ्नकारक लिहिलं असेल तर त्याच निरसन तो रामराया करतो.असा हा रघुराज..!!

समर्थ रामदास म्हणतात..

अशा या रघुराजाचा सत्वगुणी मार्ग जो अतिशय निरामय अवस्थेत घेऊन जातो.जो पूर्ण जीवन कृतार्थ करतो.त्या रामरायाचा हा भक्तीपंथ प्रत्येकाने आचरण करावा असाच आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

प्रत्येक सजग दृष्टी असलेल्या,आणि कल्याणाची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या भक्तीच्या राजपथाचा अंगीकार करावा.म्हणजे मनात असलेला विवेक हा अजूनच भक्तीरंगात रंगून जातो.

समर्थ रामदास म्हणतात..

ही भक्तीची वाट मनोभावे आचरण केल्यावर तो श्रीहरी,तो रामराय खचितच आपल्याला सगुण आणि निर्गुण स्वरूपात प्राप्त होतो यात संशय नाही..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment