*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*सिंहासनावरि रघुत्तम मध्यभागी..|*
*बंधू तिघे परम सुंदर पृष्ठभागी..|*
*वन्हीसुता निकट शोभत वामभागी..|*
*विलासतो भिम भयानक पूर्वभागी..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात...
रामपंचायतन पहाणे,त्याचे दर्शन घेणे हे केवळ भाग्याचे लक्षण.सिंहमुखी रत्नजडीत मंचकावर हे रामराय जेंव्हा आसनस्थ होतात.तेंव्हा त्यांचं असणं हेच एक पूर्ण सुख असत.
समर्थ रामदास म्हणतात..
त्या रामरायांच्या मागे त्यांची सावली आसलेले तीन बंधू हे एखाद्या अभेद्य क्षितिजपर प्रभावळी सारखे अतिशय तेजपुंज स्वरूपात दक्ष उभे असतात.
समर्थ रामदास म्हणतात...
रामरायांच्या डाव्या बाजूला ती जगन्माता जी अग्नीकन्या आहे..!ती अतिशय दैवी दृष्टीने कृपाकटाक्ष भक्तावर ठेवत ती आसनस्थ आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
या सगळ्या दैवी विभूतींचा सेवक म्हणून धन्यता पावणारा आणि स्वतः कृतार्थ होऊन तसा चिरंजीव जगणारा तो रुद्ररुपी हनुमंत एका अनन्य भक्तासारखा रामचरणाशी गढून आहे.
समर्थांनी उत्तम असे पंचायतन रूप आपल्यासमोर उभं केलं आहे.त्याची त्रिकाळ मानसपूजा करून धन्य होणं हेच आपल्यासारख्या दासांच कर्तव्य आहे.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment