समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*मार्तंडमंडप उदंडचि सौख्यकारी..|*
*त्रैलोक्यपावन प्रभू दुरिते निवारी..|*
*ध्यातो सदाशिव अखंडित चापपाणी..|*
*उदंड कीर्ती निगमी महिमा पुराणी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

हा आकाशापासून भूमीपर्यंत व्यापलेला रामराय जेंव्हा त्याच्या सिंहासनावर आसनस्थ होतो तेंव्हा सूर्य आपल्या तेजाने त्याच्या सभेवर अतिशय शीतल अशी महिरप,प्रभावळ आणि मंडप तयार करतो..!खूपच लखलखायमान हे स्वरूप आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या राजसिंहासनी बसून हा तिन्ही लोकांतील समस्त अस्तित्वाच चलन,पालन करतो.अनेक भक्तांच्या अनेक संकट,विकल्पाच पारिपत्य करून त्यांना सुखी करतो.

समर्थ रामदास म्हणतात..

प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव स्वतःचा मनातील तृषा आणि कंठातील दाह मिटवण्यासाठी अखंड या रामरायांचा धावा करतो.जप करतो आणि स्वतःला रामरूपात शांत करू पहातो.

समर्थ रामदास म्हणतात..

म्हणूनच या रामरायांची कीर्ती ही अनेक प्रचलित कथांमध्ये वर्णन करून त्याचे गुणगान भक्तांनी गायले आहेच,त्याबरोबरच पौराणिक महिमा,वेदांतात त्याची कीर्ती आणि शिकवण भरून पावली आहे.

समर्थ रामरायाचे विश्वरूप इथे वर्णन करतात आणि ते वर्णन करताना स्वतःही त्या विश्वातेजाशी एकरूप होऊ पहात आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment