*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*सुवर्णवर्ण बहुवर्ण किरणे अपारे..|*
*मिश्रीत ते तळपती घन थोरथोरे..|*
*उंचावले गगन त्याहुनी उंच भासे..|*
*मुक्ताफळी जडित मंडप तो विळासे..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
हा रामराय जो सूर्यकुळाचा आहे.त्याच्या अस्तित्वात सुर्यकिरणांच तेज,आणि रामरायाच स्वतःच सत्वतेज यांच्या किरणांची उधळण कोटी कोटी स्वरूपात वृद्धिंगत होत आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
ह्या अतीव तेजाने मेघवर्णी रामराया आणि त्याभोवतीची आभा हे अजूनच तळपुन अमोघ असे तेजोवलय निर्माण करत आहेत.
समर्थ रामदास म्हणतात..
या साऱ्या तेजोगोलामुळे गगन जे अस्तित्वात आहे हे हर्षोउन्मादीत स्वरूपात अजूनच उंच भासू लागले आहे.त्याचा विस्तार हा ब्रह्मांडा पलीकडे ही होऊ लागला आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
या साऱ्या मंडपावर जडलेले ऐश्वर्यसंपन्न मोत्यांचे हार ह्या साऱ्याची शोभा अजून द्विगुणित करत आहेत.
श्रीराम..!!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment