समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*रघुवरपर आता किर्तनी गुण गावे..|*
*मथन त्रिभुवनाचे सर्व साहित्य फावे..|*
*सकळ जन तरावे वंश ही उद्धरावे..|*
*स्वजन जन करावे रामरूपी भरावे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रघुनाथाचे गुणवर्णन हे त्याच्या उपासनेत नेहमी आठवावे,त्याचा नेहमी आदर्श घ्यावा.हे आपल्या मनाला,आयुष्याला पूरक असते.

समर्थ रामदास म्हणतात..

त्रिभुवनाच्या साऱ्या या अस्तित्वात त्याचे अस्तित्व,त्याने निर्माण केलेले जीव शिव याचे  वैचारिक मंथन करत तो किती अपरिमित आहे याचा विचार करावा.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा साऱ्या उपासनेने,रामवृत्तीने स्वतःची,आयुष्याची उत्तम उन्मन अवस्था आणून आपण कृतार्थ होऊया.या रामकृपेने पूर्ण वंश उध्दरून तो उत्तम प्रकारे कार्यफलीत होऊ शकतो.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा साऱ्या रामदासी समाजाने समूहाने एकत्रित येऊन उदंड संकीर्तन करावे. असा रामउपासनेचा स्वाहाकार आपले परके असे सारे एकत्र येऊन केवळ राममय सृष्टी निर्माण करावी अशी मनाची आर्तता आहे..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment