*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे)*
🌺
*कोडे नको रे कळहो नको रे..|*
*कापट्य कर्मी सहसा नको रे..|*
*निर्वाणचिंता निरसी अनंता..|*
*शरणागता दे बहु धातमाता..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया..आयुष्य असे भक्तीचा सरळ प्रवाह असावे.त्यामध्ये कोणतंही संकट नको.विकल्प नको.त्यामध्ये कोणताही विरोध आणि विरोधाभास नको रे..!
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया..जगताना व्यवहार करताना छोटामोठा कुटीलपणा,आपमतलबीपणा करावा लागतो तो ही शक्यतो मला करायला लागू नये इतकं निर्मळ आयुष्य मला दे रे..!
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया..मनुष्याला सगळ्यात मोठी चिंता,भय असते ती मृत्यूची..!त्या मृत्यूच भय वाटावं इतकी मनाची साशंकता,तुझ्या भक्तीबद्दलची अनास्था होऊ देऊ नको रे..!
समर्थ रामदास म्हणतात..
रामराया..मी तुला शरण आलो आहे.या शरणागत अवस्थेत तुझी भक्ती हीच मला तरणोपाय आहे.ही भक्ती,ही उपासना करण्यासाठी तुझ्या निर्गुण रूपातील काही कल्पित लीळा आणि तुझे घडलेले मूळ चरित्र याची ओळख मला करून दे रे..!
समर्थ रामरायाकडे आयुष्य सफल आणि भक्तीपूर्ण होण्यासाठी कृपा मागत आहेत.आणि त्यासाठी अखंड शरण्यभक्तीची ही अपेक्षा करत आहेत.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment