*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*
🌺
*समस्त ही पदेपदे..|*
*प्रभूपदेचि वीशदे..|*
*विचार सार जोडला.|*
*सदृश्यभास मोडला..||*
🌺
समर्थ रामदास म्हणतात..
माझ्या आयुष्याच्या प्रवासाची ही पाऊलयात्रा केवळ रघुनाथाच्या गुणपदाची सांगाती आहे.त्याचे गुणगायन हे माझ्या पावलांच्या गतीचे,वृत्तीचे कारण आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
हे संकीर्तन मी करायला लागलो तेंव्हा मला आयुष्यातील घटनांनाचा निरक्षीर विवेक कळायला लागला.आयुष्य पूर्ण करणाऱ्या परमर्थाला आपलंसं करायची बुद्धि मला या रामरायांनीच वीशद करून दिली आहे.
समर्थ रामदास म्हणतात..
हे सगळे चिंतन करून मी जेव्हा त्याचे यथोचित सार शोधू लागलो,त्या सगळ्या कृपेची मीमांसा करू लागलो तेंव्हा तिथे मला अनुभूती येऊ लागली.
समर्थ रामदास म्हणतात..
ही अनुभूती म्हणजे माझ्या आयुष्यातील ऐहिक वस्तूच्या,तापत्रयी निर्माण करणाऱ्या घटनांची अनावश्यकता,फोलपणा मला सहजतेने समजू लागला आहे.
श्रीराम..!
©प्रवीण कुलकर्णी,सातारा
९८२२६३५९०२
No comments:
Post a Comment