समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*तदूपरी विवंचना..|*
*विचार आणिता मना..|*
*मनास ठाव नाडळे..|*
*विशेष हेतही गळे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात...

या सगळ्या आयुष्यात भक्ती करत असलो तरी अनेक विवंचना प्रपंचामुळे पाठी लागतातच.यांना कोणताही धरबंध रहात नाही.

समर्थ रामदास म्हणतात..

परमार्थाचा विचार मनात जेंव्हा जेंव्हा येतात तेंव्हा तेंव्हा हे विचाररूपी विकल्प ,विवंचना मनात हटकून येतात आणि सारे धूसर होऊ लागते.

समर्थ रामदास म्हणतात..

हे झालं की मन एका जागी स्थिर रहात नाही.त्याला अनेक प्रकारची व्यवधाने सुरू होतात आणि मी अतिशय उपासनेपासून दूर होऊ लागतो.

समर्थ रामदास म्हणतात..

आणि मग मी केलेला संकल्प तडीस जायच्या सगळ्या शक्यता मावळू लागतात.सगळा परमार्थ अशक्य वाटू लागतो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी,सातारा
९८२२६३५९०२

No comments:

Post a Comment