समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*विमळगुणशिळाचे आदरे गुण गावे..|*
*विमलगुणशिळाचे दास वाचे वदावे..|*
*विमळगुणशिळाचा अंतरी वेध लागो..|*
*विमळगुणशिळाचा रंगणी रंग गाजो..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

दायार्द्र अशा मनाने परिपूर्ण अशा राममूर्तीचे प्रत्येक गुण नेहमी गावे.त्याचे चिंतन करत त्या गुणांचे आचरण आपण कसे करता येईल याचा विचारही करावा.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा सर्वकृपाळू राममूर्तींचे तन,मनाने आपण दास म्हणवून घ्यावे.म्हणजे असे रामदास होणं हे रामापर्यंत जाण्याचा राजमार्गच आहे हे सर्वमान्य आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या सर्वव्यापी सर्वसाक्षी राममूर्तीची मनातून आतुरता निर्माण व्हावी इतकी की त्याच्या सगुण आणि निर्गुण स्वरूपातला फरक कळू नये.इतकं रममाण व्हाव.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा रंगधीर रामरायाच्या सगुणराममूर्तींच्या भक्तरंगात रंगून स्वतःच अस्तित्व त्यात विसरून जावे.केवळ रामरंगी होऊन जावे.रामतल्लीन होऊन जावे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*बहुविध भजनाची दैवते पाहिली हो..|*
*सकळ त्यजुनि रामी वृत्ति हे राहिली हो..|*
*विमळगुणशिळाची लागली प्रीति मोठी..|*
*विमळ हृदय होता उद्धरे कूळकोटी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

विविध दैवते,पंथ यांची उपासना करणारे अनेक भक्त पाहिले.त्यांचं अवलोकन केलं.त्यांची संकीर्तन पद्धती अभ्यासली.ती विविध दैवतांचे ही पूजन केले..!

समर्थ रामदास म्हणतात...

पण सगळ्यात शेवटी जेंव्हा रामरायांच्या पायाशी आलो तेंव्हा सगळ्या दैवतांचे सार मला या राघवमूर्तीत दिसले.आणि मग मन,तन, वृत्ती या त्याच्या संकीर्तनात कायमचा लिन झालो.

समर्थ रामदास म्हणतात...

या रामरायांच दायार्द्र मन,त्याची करुणापूर्ण दृष्टी, त्याच मनोहारी सर्वांग दर्शन याची अवीट अशी गोडी मनाला प्रेमात पाडणारी आहे.त्यात कायमच गुंतून राहील अस त्याच श्रेष्ठत्व दिसून येत.

समर्थ रामदास म्हणतात..

एकदा का या रामरायांच्या संकीर्तनाची आवड मनात जागु लागली,हृदयात वसू लागली की स्वजन्माचा उद्धार होतोच पण त्याबरोबरच अनेक आधीच्या कुळांचाही उद्धार होऊन सकल आयुष्य कृतार्थ होते...!

श्रीराम..!!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*कमळनयनरामे वेधिले पूर्णकामा..|*
*सकळभयविरामे राम विश्रामधामे..|*
*घननिळतनुश्यामे चित्ततोषे आरामे..|*
*भुवनभजननेमे तारिले दास रामे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

हा रघुराज आपल्या कमळाच्या आकाराच्या तृप्त नजरेने आपल्या मनातलं सगळं इच्छित जाणून घेतो आणि ती पूर्ण करायचा कृपाप्रसादाने प्रयत्न करतो.

समर्थ रामदास म्हणतात..

हा रामराया आपल्या मनातली सगळी भय,विकल्प संपवून देतो आणि मन एका सदाविश्राम अवस्थेत आणून त्याच्यात सामावून घेतो.

समर्थ रामदास म्हणतात..

घननिळवर्णी अशा  रामराजाच दर्शन हे चित्ताच परिपालन,पोषण तसेच आनंद भरून आत्मज्ञानी सुख आराम देणार आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामसंकीर्तनाने या जगातील प्रत्येक जीविताना एक आधार मिळालेला आहे.त्या आधारे रामरायाने सगळ्यांना हा भवसागर तरुन जाण्याची अध्यात्मिक,मानसिक शक्ती प्रदान केली आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*रविकुळटिळकाचे रूपलावण्य पाहे..|*
*रविकुळटिळकाचे चिंतनी चित्त राहे..|*
*रविकुळटिळकाची कीर्ती जीवी भरावी..|*
*रविकुळटिळकाची मूर्ती ध्यानी धरावी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रघुराज हा सूर्यवंशी आहे.त्याच तेज या वंशाला साजेसं दिगंत आहे.अपरंपार आहे.आणि ते तेज त्याच्या पुरुषी शौष्ठवात खुलून दिसत आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

ह्या सूर्यवंशी रघुराजाचे अनेक प्रकारच्या कथांमधले चरित्र,अनेक स्तोत्रामधील मंगल असे वर्णन आठवत आपले मन त्याच्या ठायी कायम सुपूर्द करावे. लिन व्हावे.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा रघुराजाचे पराक्रमी स्वरूप,त्याची क्षमा आणि भक्तवत्सल अशी भूमिका आठवत ती आपल्या मनात कायम उतरवत ठेवावी.

समर्थ रामदास म्हणतात..

रघुराजाचे मनस्वी ध्यान तन,मनाने करत आपल्या आयुष्याचा हा मार्ग त्याच्याकडे घेऊन जाईल अश्या भक्तीच्या पायवाटेने  कायम आपल्यासमोर उपासनेने सिंचित करत जावी.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*आनंदकंद रघुनंदन शोभताहे..|*
*कंदर्पकोटी वदनी उपमा न साहे..|*
*आकर्ण पूर्णनयनी रमणीय शोभा..|*
*विस्तीर्ण कीर्ण भुषणी जगदीश उभा..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

तो रघुराज सर्व आनंदाचा गाभा आहे.ज्याच्या अस्तित्वातून सारे आनंदपथ निर्माण होतात..आणि ज्याच्या चरणाशी सगळे आनंदपथ शरण जातात.असा रघुनायक एका दैदीप्यमान आदर्शासारखा शोभून दिसतो आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

अतिशय मुग्ध असे हे पुरुषी सौन्दर्याची एक खाण असलेला हा रामराय तो त्यांच्या सुहास्यवदनी,लाघवी असे स्वरूप दर्शन देतो.की ज्याची तुलना दुसऱ्या कशाशीही होत नाही.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामरायाचे मुखावलोकन करताना त्याचे पूर्ण मत्स्यनयन त्याच्या कानापर्यंत गेलेल्या रमणीय अशा प्रदेशाचे अत्यंत उत्कट असे दर्शन साध्य होते.

समर्थ रामदास म्हणतात..

असा हा रामराय आपलं हे आश्वस्त रूप घेऊन,तिन्ही त्रिकाळ हा जगनियंता जगाच्या कल्याणासाठी आपले आशीर्वादयुक्त वैभव दाखवत सदा दक्ष उभा आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*सुवर्णवर्ण बहुवर्ण किरणे अपारे..|*
*मिश्रीत ते तळपती घन थोरथोरे..|*
*उंचावले गगन त्याहुनी उंच भासे..|*
*मुक्ताफळी जडित मंडप तो विळासे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

हा रामराय जो सूर्यकुळाचा आहे.त्याच्या अस्तित्वात सुर्यकिरणांच तेज,आणि  रामरायाच स्वतःच सत्वतेज यांच्या किरणांची उधळण कोटी कोटी स्वरूपात वृद्धिंगत होत आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

ह्या अतीव तेजाने मेघवर्णी रामराया आणि त्याभोवतीची आभा हे अजूनच तळपुन अमोघ असे तेजोवलय निर्माण करत आहेत.

समर्थ रामदास म्हणतात..

या साऱ्या तेजोगोलामुळे गगन जे अस्तित्वात आहे हे हर्षोउन्मादीत स्वरूपात अजूनच उंच भासू लागले आहे.त्याचा विस्तार हा ब्रह्मांडा पलीकडे ही होऊ लागला आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या साऱ्या मंडपावर जडलेले ऐश्वर्यसंपन्न मोत्यांचे हार ह्या साऱ्याची शोभा अजून द्विगुणित करत आहेत.

श्रीराम..!!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*मार्तंडमंडप उदंडचि सौख्यकारी..|*
*त्रैलोक्यपावन प्रभू दुरिते निवारी..|*
*ध्यातो सदाशिव अखंडित चापपाणी..|*
*उदंड कीर्ती निगमी महिमा पुराणी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

हा आकाशापासून भूमीपर्यंत व्यापलेला रामराय जेंव्हा त्याच्या सिंहासनावर आसनस्थ होतो तेंव्हा सूर्य आपल्या तेजाने त्याच्या सभेवर अतिशय शीतल अशी महिरप,प्रभावळ आणि मंडप तयार करतो..!खूपच लखलखायमान हे स्वरूप आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या राजसिंहासनी बसून हा तिन्ही लोकांतील समस्त अस्तित्वाच चलन,पालन करतो.अनेक भक्तांच्या अनेक संकट,विकल्पाच पारिपत्य करून त्यांना सुखी करतो.

समर्थ रामदास म्हणतात..

प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव स्वतःचा मनातील तृषा आणि कंठातील दाह मिटवण्यासाठी अखंड या रामरायांचा धावा करतो.जप करतो आणि स्वतःला रामरूपात शांत करू पहातो.

समर्थ रामदास म्हणतात..

म्हणूनच या रामरायांची कीर्ती ही अनेक प्रचलित कथांमध्ये वर्णन करून त्याचे गुणगान भक्तांनी गायले आहेच,त्याबरोबरच पौराणिक महिमा,वेदांतात त्याची कीर्ती आणि शिकवण भरून पावली आहे.

समर्थ रामरायाचे विश्वरूप इथे वर्णन करतात आणि ते वर्णन करताना स्वतःही त्या विश्वातेजाशी एकरूप होऊ पहात आहेत.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*सिंहासनावरि रघुत्तम मध्यभागी..|*
*बंधू तिघे परम सुंदर पृष्ठभागी..|*
*वन्हीसुता निकट शोभत वामभागी..|*
*विलासतो भिम भयानक पूर्वभागी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात...

रामपंचायतन पहाणे,त्याचे दर्शन घेणे हे केवळ भाग्याचे लक्षण.सिंहमुखी रत्नजडीत मंचकावर हे रामराय जेंव्हा आसनस्थ होतात.तेंव्हा त्यांचं असणं हेच एक पूर्ण सुख असत.

समर्थ रामदास म्हणतात..

त्या रामरायांच्या मागे त्यांची सावली आसलेले तीन बंधू हे एखाद्या अभेद्य क्षितिजपर प्रभावळी सारखे अतिशय तेजपुंज स्वरूपात दक्ष उभे असतात.

समर्थ रामदास म्हणतात...

रामरायांच्या डाव्या बाजूला ती जगन्माता जी अग्नीकन्या आहे..!ती अतिशय दैवी दृष्टीने कृपाकटाक्ष भक्तावर ठेवत ती आसनस्थ आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या सगळ्या दैवी विभूतींचा सेवक म्हणून धन्यता पावणारा आणि स्वतः कृतार्थ होऊन तसा चिरंजीव जगणारा तो रुद्ररुपी हनुमंत एका अनन्य भक्तासारखा रामचरणाशी गढून आहे.

समर्थांनी उत्तम असे पंचायतन रूप आपल्यासमोर उभं केलं आहे.त्याची त्रिकाळ मानसपूजा करून धन्य होणं हेच आपल्यासारख्या दासांच कर्तव्य आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*चपेटा विझे काळमाथा जयाचा..|*
*धरी रे मना पंथ या राघवाचा..|*
*विवेकी जने राजपंथे चि जावे..|*
*तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

ज्याच्या नामाच्या सत्वगुणी आघाताने मनुष्याच्या अदृष्ट भाळी जे काही विघ्नकारक लिहिलं असेल तर त्याच निरसन तो रामराया करतो.असा हा रघुराज..!!

समर्थ रामदास म्हणतात..

अशा या रघुराजाचा सत्वगुणी मार्ग जो अतिशय निरामय अवस्थेत घेऊन जातो.जो पूर्ण जीवन कृतार्थ करतो.त्या रामरायाचा हा भक्तीपंथ प्रत्येकाने आचरण करावा असाच आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

प्रत्येक सजग दृष्टी असलेल्या,आणि कल्याणाची इच्छा असलेल्या प्रत्येकाने या भक्तीच्या राजपथाचा अंगीकार करावा.म्हणजे मनात असलेला विवेक हा अजूनच भक्तीरंगात रंगून जातो.

समर्थ रामदास म्हणतात..

ही भक्तीची वाट मनोभावे आचरण केल्यावर तो श्रीहरी,तो रामराय खचितच आपल्याला सगुण आणि निर्गुण स्वरूपात प्राप्त होतो यात संशय नाही..!

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*चमत्कारले चित्त हे रामगुणी..|*
*उठे कीर्ति वाखाणिता प्रीती दूणी..|*
*रघुनायकासारिखा देव नाही..|*
*क्रिया पाहता चोखडी सर्व काही..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

रघुराजांच्या कृपेचे अनेक दाखले,कहाण्या,लीला हे ऐकणे म्हणजे चमत्कारापेक्षा कमी नाहीत.कारण कल्पनेच्या पलीकडच सुख हा रघुराज आपल्याला देतो.त्यामुळे अपरंपार सुख मनात साठून येते.

समर्थ रामदास म्हणतात...

प्रत्येकवेळी रामराया नवीन असे कृपेचे सागर माझ्यासमोर खुल करतो.आणि ते अनुभवताना माझ्या मनात त्याच्याबद्दलची भक्ती आणि प्रेम दुणावते आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

रघुराज हा असा देवराज आहे की जो संयत सहनशक्ती आणि अपूर्व रणशक्ती याचा संयम आहे.याशिवाय वात्सल्य आणि मित्रत्व याचाही एकमेव आदर्श तो एकमेवच आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामरायाचा प्रत्येक पराक्रम,प्रत्येक लीला, प्रत्येक कार्य हे रोखठोक आणि समर्पक आहे.त्यात कोणतंही वैगुण्य राहिलेल नाही.इतका तो गुणसंपन्न असा देव आहे.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*चळेना समरंगणी ठाण मागे..|*
*चळेना मुखे बोलता वाक्य युगे..|*
*चळेना कृपासिंधु कल्पांतकाळी..|*
*रघुराज हा आदरे दास पाळी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

कोणतंही समरंगण असो जे मनात उठत ते द्वंद्व किंव्हा जे दोन विचारात उठतो तो विकल्प,किंव्हा नीती,अनीती मधील अक्षय लढाई अशा काळात जो दृढपणे सदप्रवृत्त भक्तांच्या मागे उभा राहतो असा हा रघुराज आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हा रघुराजा ज्याच वचन हे एकवचन म्हणून सुप्रसिद्ध आहे.जे कालातीत,युगातीत आहे.कितीही काळ गेला तरी ते वचन काळांचे, युगांचे पडदे भेदून सुद्धा शुद्ध रहाते.

समर्थ रामदास म्हणतात..

या रामरायाचे रामतत्व असे आहे की कल्पांताचा मेघ जरी भूमीवर प्रकटला तरी या रघुराजाची कृपा करण्याची वृत्ती अबाधित,अक्षय रहाते.

समर्थ रामदास म्हणतात..

असा हा प्रेमळ रघुराजा अतिशय आत्मियतेने आणि  अखंडपणे दासाची,भक्तांची काळजी घेत आपलं भक्तवत्सल हे विशेषण सिद्ध करत असतो.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*चकोरासी चंद्रोदयी सुख जैसे..|*
*रघुनायका देखता सुख तैसे..|*
*सगुणासी लाचावले स्थिर राहे..|*
*रघुनंदनेवीण काही न पाहे..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात...

चंद्रोदयाच सुख सर्वात जास्त चकोर पक्षाला असते कारण चंद्रकिरणे ही त्या चकोराची खरी भूक असते. गरज असते.ज्याने तो अंतर्यामी केवळ आनंदसागर अनुभवत असतो.

समर्थ रामदास म्हणतात..

असेच अमाप सुख मला होते जेंव्हा मी रामरायांचे मुखदर्शन घेतो.तो कृपासागर राम आपल्या मनात एकरूपतेचा,स्नेहल आशीर्वादाचा अवघा मेघ रिता करतो.

समर्थ रामदास म्हणतात..

या सगुण दर्शनाला हे मन अतिशय अधीर आहे.केवळ त्यासाठी अतिशय लालची होऊ पाहतय.आणि ही भक्तीची लालूच दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे.

समर्थ रामदास म्हणतात..

हा रामरायांच्या सगुण भक्तीचा नाद आता इतका मधुर वाटू लागला आहे की त्याशिवाय हे मन कुठेही स्थिर होत नाहीये.कुठेही रुळत नाहीये.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२

समर्थांचे साहित्यविश्व (अपरिचित करुणास्रोत्रे)

*समर्थांचे साहित्यविश्व*
*अपरिचित करुणास्रोत्रे*

🌺
*लघुलाघवी राम कोदंडधारी..|*
*मनी चिंतिता शोक संताप हारी..|*
*महा संकटे नाम घेता निवारी..|*
*भवसागरी मूढ पाषाणतारी..||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात..

अत्यंत दृष्टीला ला प्रिय आणि लोभस असा हा रामराय.. जो त्याच्या आशिर्वचनी नजरेमुळे अत्यंत जवळचा वाटतो तसा हाती धरलेल्या कोदंड धनुष्यामुळे त्याच रणधीर स्वरूप ही अत्यंत कर्तृत्वशाली वाटत.

समर्थ रामदास म्हणतात..

अशा रघुराजाच चिंतन केलं की शोकरूपी विकल्प,संतापरुपी विघ्न लयाला जाऊन मनात केवळ सात्विकतेचा वास सुरू होतो.या सात्विकतेमुळे वाईट असे जे काही सभोवती असेल त्याचा नाश होतो.

समर्थ रामदास म्हणतात..

घनघोर संकटे,विषमकाळाचे राक्षस हे या रामराया चे नुसतं नाम घेतलं तरी भक्तांपासून दूर होतात.तो रघुराज त्या सगळ्यांच निरसन केवळ दृष्टीफेक करून टाकतो.

समर्थ रामदास म्हणतात..

भवसागरातल्या प्रत्येक अडकलेल्या मुमुक्षुला, शिळारुप अशा मूढ वृत्तीला हे रामनाम सुखपुर्ती मिळवून देते.साफल्याचा किनारा मिळवून देते.

श्रीराम..!

©प्रवीण कुलकर्णी
९८२२६३५९०२